Ahmednagar Municipal Election : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा छिंदम विजयी; पत्नी पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:40 IST2018-12-10T14:40:00+5:302018-12-10T14:40:10+5:30
छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे़

Ahmednagar Municipal Election : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा छिंदम विजयी; पत्नी पराभूत
अहमदनगर : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे़ पहिल्या काही फेऱ्यांत पिछाडीवर असलेल्या छिंदमने नंतर आघाडी घेतली़ ही आघाडी शेवटपर्यंत राखत त्याने विजय मिळविला़
श्रीपाद शंकर छिंदम प्रभाग ९ (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष निवडणूक लढवत होता़ या मतदारसंघात चार फेºयांनंतर मनसेचे पोपट पाथरे यांनी पाचशे मतांची आघाडी घेतली होती़ मात्र, नंतर सहाव्या फेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली़ त्याची ही आघाडी तेराव्या फेरीनंतर १८५० मतांपर्यंत पोहोचली आहे़ या प्रभागात छिंदमविरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्टÑवादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़
श्रीपाद छिंदमची पत्नी स्नेहा या प्रभाग १३ (क) मधून निवडणूक लढवत होत्या़ त्यांच्याविरोधात निलम गजेंद्र दांगट (राष्ट्रवादी) गायत्री नरेंद्र कुलकर्णी (भाजप), सुवर्णा संजय गेनाप्पा (शिवसेना), सुनीता शांताराम राऊत हे रिंगणात होते़ येथे शिवसेनेच्या गेनाप्पा विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे़