शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar Municipal Election : निकालाची उत्सुकता : दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 10:01 IST

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३३९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले़ सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी बारानंतर चित्र स्पष्ट होईल़

अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३३९ उमेदवारांचे भवितव्य रविवारी सायंकाळी इलेक्ट्रॉनिक यंत्रात बंद झाले़ सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी बारानंतर चित्र स्पष्ट होईल़महापालिकेच्या ६८ जागांसाठी मतदान घेण्यात आले़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती़ रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा होत्या़ शहरासह उपनगरातील ३३७ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले़ पोलीस बंदोबस्तात मतपेट्या भवानीनगर येथील वखार महामंडळाच्या गोदामात हलविण्यात आल्या़काँग्रेस आघाडी, भाजप आणि शिवसेना, या तिन्ही पक्षांनी बहुतांश प्रभागात तुल्यबळ उमेदवार दिले़ त्यामुळे तिरंगी लढती पाहायला मिळाल्या़ या निवडणुकीत भाजपाने प्रथमच प्रचारात आघाडी घेतली़ राष्ट्रवादीने नेत्यांच्या सभा न घेता घरोघरी जाऊन प्रचार केला़ भाजपाच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्र्यांची, तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा झाली़ काँग्रेसकडून डॉ़ सुजय विखे निवडणुकीत सक्रिय होते़ सेनेचे आमदार अनिल राठोड यांनी खिंड लढविली़ राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपने विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली़ भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेली तीनशे कोटींची घोषणाही चांगलीच गाजली़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्याक्षणी काँग्रेसचे पाच उमेदवार भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसची नाचक्की झाली़ यासह अनेक मुद्यांवरून ही निवडणूक चांगलीच गाजली असून, नगरकर कुणाला कौल देतात, हे निकालानंतर स्पष्ट होईल़

टॅग्स :Ahmednagar Municipal Electionअहमदनगर महानगरपालिका निवडणूकahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना