Ahmednagar: हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा; कोपरगाव तालुक्यातील कारवाई 

By रोहित टेके | Updated: May 4, 2023 09:15 IST2023-05-04T09:15:03+5:302023-05-04T09:15:37+5:30

Ahmednagar: कोपरगाव तालुक्यातील खडकी व कोकमठाण शिवारात बेकायदा हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईतून बुधवारी(दि.३) रात्री एका महिलेसह एकावर गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagar: A crime against a woman selling hand-baked liquor; Action in Kopargaon Taluk | Ahmednagar: हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा; कोपरगाव तालुक्यातील कारवाई 

Ahmednagar: हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा; कोपरगाव तालुक्यातील कारवाई 

- रोहित टेके 

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील खडकी व कोकमठाण शिवारात बेकायदा हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईतून बुधवारी(दि.३) रात्री एका महिलेसह एकावर गुन्हा दाखल केला आहे. या वेगवेगळ्या कारवाईतून सुमारे २७ हजार रुपये किमतीच्या २७० लिटर दारूसह दारू तयार करण्याचे रसायन पोलिसांनी जप्त केले आहे.

याप्रकरणी एका गुन्ह्यात ज्ञानेश्वर भांगरे यांनी सीमा संतोष गोतीस (वय २९ वर्षे रा. खडकी ता. कोपरगाव ) तर दुसऱ्या गुन्हा पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कु-हाडे यांनी सोमनाथ उमाजी पवार (वय ४५, रा. कोकमठाण, ता. कोपरगाव) या दोघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा उशिरा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar: A crime against a woman selling hand-baked liquor; Action in Kopargaon Taluk