अहिल्यानगरमधील सावेडी उपनगरातील नवलेनगर परिसरात मुलाने आईचा निघृण खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजेच्या दरम्यान समोर आली. मुलाने कैऱ्या कापायच्या अडकित्त्याने आईची हत्या केली. त्यानंतर तो आईच्या मृतदेहाशेजारीच गोट्या खेळत बसला होता. हे घडण्यापूर्वी शेजाऱ्यांना घरातून भांडणाचा आवाज येत होता, त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस पोहोचेपर्यंत तरुणाने आईची हत्या केली होती.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सगळ्यात धक्कादायक आणि मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे घटनेनंतर मुलगा आईच्या मृतदेहाशेजारी एकटाच गोट्या खेळत बसला होता. पोलिसांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु अर्धातास उलटूनही तो बाहेर न आल्याने त्याला दरवाजा तोडून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला.
बेबी सुधाकर गवारे (वय ६०, रा. गजानन मंदिरासमोर, नवलेनगर, सावेडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुहास सुधाकर गवारे (३३) असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कैरी कापण्याचा अडकित्त्याच घेतला
मयत आई व मुलगा नवलेनगर भागात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. मुलगा आईकडे सतत पैसे मागायचा. पैसे दिले नाही म्हणून मुलगा सुहास याने मयत आईला मंगळवारी बेडरुममध्ये डांबून ठेवले. पैसे न दिल्याच्या रागातून त्याने कैरी कापण्याच्या अडकित्याने वार करत आईला जीवे ठार केले.
हा प्रकार परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी पोलिसांना कॉल करून ही माहिती कळवली. पोलिसांचे पथक काहीवेळातच घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा मुलगा घरात पलंगावर एकटाच गोट्या खेळत बसलेला असल्याचे पोलिसांना खिडकीतून दिसले.
दरवाजा पलंग आणि कोठ्यांनी केला होता बंद
पोलिसांनी त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले; पण बराच वेळ झाला तरी त्याने दरवाजा उघडला नाही. त्याने दरवाजाला आतून पलंग व धान्याच्या कोठ्या लावल्या होत्या. हातातील कात्री, अडकित्ता व खेळण्याच्या गोट्या तो पोलिसांना दाखवून स्वतःशीच बडबडत होता.
अखेर पोलिसांनी दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले. मृतदेह मयत महिलेचा शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयत गवारे दुसऱ्याच्या घरी करायच्या स्वयंपाकाचे काम
गवारे कुटुंब हे कोपरगाव तालुक्यातील आहे. मयत बेबी गवारे या मुलगा सुहासा याच्यासह अहिल्यानगरमधील भाड्याच्या खोलीत राहत होत्या. मयत गवारे या दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचे काम करून घर चालवित होत्या. मुलाला नोकरी मिळत नव्हती आणि त्याचे लग्नही होत नव्हते, त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता.
बहिणीने दिली तक्रार
मयत महिलेची मुलगी सुवर्णा दिगंबर घुले यांनी मंगळवारी रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून फिर्यादीचा भाऊ सुहास याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने कैऱ्या कापण्याचा अडकित्त्याने आईचा खून केला, असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
मुलगा मनोरुग्ण की नशेत?
आईच्या खुनाबाबबत पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने माझ्याकडून चूक झाली असल्याची कबुली दिली. मुलगा मनोरुग्ण असल्यासारखा वर्तन करत होता. तो नशा केल्यामुळे असे वागत असावा, असाही पोलिसांना संशय आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिली.
Web Summary : In Ahilyanagar, a man murdered his mother with a nutcracker after she refused him money. He then played beside her body. Neighbors alerted police after hearing a fight. The accused has been arrested; investigation underway.
Web Summary : अहिल्यानगर में एक बेटे ने पैसे से इनकार करने पर सुपारी काटने वाले औजार से अपनी माँ की हत्या कर दी। फिर वह उसके शव के पास खेलता रहा। झगड़ा सुनकर पड़ोसियों ने पुलिस को सूचना दी। आरोपी गिरफ्तार, जांच जारी।