सव्वीस गावांत कृषीचे ‘मॉडेल व्हिलेज’
By Admin | Updated: June 7, 2023 10:55 IST2014-05-09T00:51:04+5:302023-06-07T10:55:28+5:30
ज्ञानेश दुधाडे , अहमदनगर जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानातर्गंत सन २०१३-१४ अंतर्गंत २६ गावांत कृषी विभागाकडून मॉडेल व्हिलेज तयार करण्यात येणार आहे.

सव्वीस गावांत कृषीचे ‘मॉडेल व्हिलेज’
ज्ञानेश दुधाडे , अहमदनगर जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानातर्गंत सन २०१३-१४ अंतर्गंत २६ गावांत कृषी विभागाकडून मॉडेल व्हिलेज तयार करण्यात येणार आहे. या गावांसाठी पुढील तीन वर्षासाठी प्रत्येकी ३ कोटींप्रमाणे ७८ कोटींचा निधी देण्यात येणार आहेत. यातून सिंचनासह कृषीच्या यांत्रिकीकरणावर भर देण्यात येणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून कोरडवाहू शेती अभियान अस्तित्वात आलेले आहे. ७५ टक्के जिरायत शेती असणार्या, ७५ टक्के पाणलोटांची कामे पूर्ण केलेली गावे, शेतकर्यांची मागणी असणार्या गावांची निवड शासन पातळीवर करण्यात आलेली आहेत. या गावात कोरडवाहू शेतीला स्थैर्य प्रदान करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना तयार करण्यात येणार आहेत. कृषी मालाची उत्पादकता वाढवून प्रति क्विंटल उत्पादन खर्च कमी करणे, यांत्रिकीकरणाव्दारे उत्पादन खर्च कमी करणे, सूक्ष्मसिंचनाचा वापर करून सिंचनाची क्षमता वाढविणे, शेत मालास योग्य भाव मिळण्यासाठी निर्यातक्षम माल तयार करणे, प्रतवारी, पॅकेजिंग, वाहतूक, साठवण आदी सुविधा उभारून शेतकरीभिमुख कृषी पणन धोरण राबविण्यात येणार आहे. योजनेत निवड झालेल्या गावात मृदसंधारण, जलसंधारण, यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, ठिबक, तुषार, साखळी बंधारे, शेततळी, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेतकर्यांना प्रशिक्षण, वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना अल्प भूधारक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकर्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ्रपहिल्या टप्प्यात चौदा गावे योजनेसाठी पहिल्या टप्प्यात १४ गावांची निवड करण्यात आली आहे. यात रायतळे (पारनेर), तांदळी वडगाव (नगर), चिखली (श्रीगोंदा), सातवड (पाथर्डी), बावी (जामखेड), लोहगाव (नेवासा), थाटे (शेवगाव), कणगर बु (राहुरी), उक्कडगाव (कोपरगाव), भामाठाण (श्रीरामपूर), अस्तगाव (राहाता), शेडगाव (संगमनेर) आणि वाशेरे (अकोले) यांचा समावेश आहे. दुसर्या टप्प्यात खासबाब म्हणून आणखी १२ गावांची निवड करण्यात आली आहे. यात वांबोरी आणि कात्रड (राहुरी), चिंचपूर, शिबलापूर, खळी आणि पिंप्री लौकी (संगमनेर), केलवड, गोगलगाव, डोºहाळे, पिंपरी निर्मळ, चितळी, धनगरवाडी (राहाता) यांचा समावेश आहे. योजनेत ट्रॅक्टर योजनेसाठी शेतकर्याला २ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यात ९० हजार रुपये ट्रॅक्टरसाठी तर उर्वरित अवजारांसाठी आहे. शेतकरी बचत गटाला हे अनुदान ४ लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. उर्वरित साहित्याला ५० टक्के अनुदान राहणार आहे.