शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीचा राजीनामा देताच दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर; अहमदनगर दक्षिणमध्ये तुतारी वाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 19:33 IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Nilesh Lanke ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्या पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यामध्ये पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत असलेल्या लंके यांनी शुक्रवारी रात्रीच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज लगेचच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे नगर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगणार आहे.

निलेश लंके हे मागील काही महिन्यांपासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिल्याने ते महायुतीत गेले आणि त्यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचंही नाव लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत होतं. मात्र काही दिवसांपूर्वी लंके यांनी आपल्या मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन केले होते. त्यानंतर कोल्हे यांनी निलेश लंकेंना हातात तुतारी घेण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश निश्चित झाला. मात्र ते अजित पवारांच्या पक्षाचे आमदार असल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. अखेर काल निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांच्या लोकसभा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.

आमदारकीचा राजीनामा देताना कोसळले होते रडू

निलेश लंके यांनी शुक्रवारी सायंकाळी सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधताना लंके यांनी विखे पाटील यांच्यावर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका केली. विखे यांनी आपल्यावरील रागापोटी पारनेरची सर्व कामे अडवली. त्यांनी मतदारसंघात दहशत निर्माण केली आहे. या दहशतीला पायबंद घालण्यासाठी आपण मैदानात उतरलो असल्याचे लंके म्हणाले. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी लंके यांना रडू कोसळले. जनतेने आपणाला निवडून दिले. पण ही लढाई लढण्यासाठी मुदतपू्र्व राजीनामा देण्याची वेळ आली. आपण शरद पवारांना लोकसभा लढवण्याचा शब्द दिला होता. मधल्या वाईट काळात शरद पवारांना साथ देऊ शकलो नाही याचे दु:ख आहे. ती भरपाई करण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेAhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४