उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्तांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST2021-06-24T04:16:18+5:302021-06-24T04:16:18+5:30
अहमदनगर : महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे. उपायुक्त पठारे यांच्या जागी राहुरी नगर ...

उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्तांकडे
अहमदनगर : महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे. उपायुक्त पठारे यांच्या जागी राहुरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास कुऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु कुऱ्हे हे अद्याप हजर झाले नाहीत. त्यामुळे उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त सचिन राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिकेत दोन उपायुक्त पदे मंजूर आहेत. उपायुक्त प्रदीप पठारे यांना महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी पदोन्नती मिळाली. त्यांच्याकडे सामान्य प्रशासनासह अन्य दहा विभागांची जबाबदारी होती. पठारे यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांनी उपायुक्तपदाचा पदभार सोडला आहे. तसे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले आहे. उपायुक्तपदी कर्हे यांची नियुक्ती झाली आहे; परंतु त्यांना राहुरी नगर परिषदेतून सोडले नाही. त्यामुळे महापालिकेचे उपायुक्तपद रिक्त आहे. उपायुक्तपदाचा पदभार सहायक आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.