शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रुग्णालयांकडून नऊ लाखांची अतिरिक्त बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:15 IST

अहमदनगर : शहरातील लहान-मोठ्या २२ कोविड रुग्णालयांनी कोरोना रुग्णांच्या बिलात अतिरिक्त ९ लाख ३६ हजार रुपये आकारले होते. ...

अहमदनगर : शहरातील लहान-मोठ्या २२ कोविड रुग्णालयांनी कोरोना रुग्णांच्या बिलात अतिरिक्त ९ लाख ३६ हजार रुपये आकारले होते. महापालिकेने केलेल्या लेखा परीक्षणात ही बाब समोर आली आहे.

कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याआधी रुग्णांना दिलेले बिल तपासले जाते. त्यासाठी महापालिकेने ४८ लेखा परीक्षकांची नेमणूक केली आहे. हे लेखा परीक्षक रुग्णालयात जाऊन बिलांची तपासणी करतात. २० एप्रिल ते ३१ मे या काळात लेखा परीक्षकांकडून ५ हजार २४९ रुग्णांच्या बिलांची तपासणी झाली. यामध्ये ९ लाख ३६ हजार ७०० रुपये अतिरिक्त आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम कमी करून रुग्णांना बिल दिले गेले. त्यामुळे रुग्णांना आधार मिळाला. अतिरिक्त बिले आकारणाऱ्या रुग्णालयांच्या यादीत शहरातील बड्या रुग्णालयांचाही समावेश आहे. रुग्णांना पक्के छापील बिल न देता कच्चे बिल देऊन पैसे उकळण्याचेही प्रकार सुरू होते. हे प्रकार पूर्व लेखा परीक्षणामुळे थांबले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत झालेल्या तपासणीत जिल्ह्यात रुग्णालयांच्या बिलात एक कोटी २० लाख रुपयांची तफावत आढळली होती. ही रक्कम रुग्णांना परत करण्यासाठी प्रशासनाने रुग्णालयांना नोटिसा बजावल्या. मात्र, त्याविरोधात रुग्णालयांनी न्यायालयात धाव घेतली. दुसऱ्या लाटेत सरकारने सावध भूमिका घेत रुग्णांना डिस्चार्ज देण्याआधीच बिलांची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे.

.....

७० रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार

शहरातील कोविड केअर सेंटरमधील पाच हजार बिलांची लेखा परीक्षकांकडून तपासणी करण्यात आली आहे. यापैकी केवळ ७० रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार झाले असल्याचे लेखा परीक्षणातून समोर आले आहे.

.....

सुरभी हॉस्पिटलला नोटीस

औरंगाबाद महामार्गावरील सुरभी रुग्णालय सोयीनुसार ऑक्सिजन, नोंदणी फी, साफसफाई, आयसीयूचे अतिरिक्त बिल आकारत आहे. यासंदर्भात लेखा परीक्षकांकडून शासकीय दराने बिल आकारण्याबाबत रुग्णालयास कळविण्यात आले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, रुग्णांना डिस्चार्ज देण्याआधी बिल तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी या हॉस्पिटलला बजावली आहे.

..............

मुंबई, पुण्याच्या तोडीचे दर

नगर शहरातील व जिल्ह्यातील काही रुग्णालयांत दर्जेदार सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र, शासनाने परवानगी दिल्याने या रुग्णालयांनीही मुंबई, पुण्यातील दराप्रमाणे रुग्णांना दर आकारले आहेत.