शिवसैनिकांनी मारले केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 13:50 IST2020-12-12T13:49:43+5:302020-12-12T13:50:41+5:30

शेतक-यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दाबा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याचा शनिवारी (दि. १२) संगमनेरात शिवसैनिकांनी एकत्र येवून निषेध नोंदविला.

Add to the photo of Union Minister of State killed by Shiv Sainiks | शिवसैनिकांनी मारले केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे

शिवसैनिकांनी मारले केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे

संगमनेर : शेतक-यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दाबा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याचा शनिवारी (दि. १२) संगमनेरात शिवसैनिकांनी एकत्र येवून निषेध नोंदविला. शहरातील नवीन नगर रस्ता परिसरात दानवेंच्या फोटोला शिवसैनिकांनी ‘जोडे मारो’ आंदोलन केले.

शिवसेनेचे तालुका प्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख  पप्पू कानकाटे, इम्तिायाज शेख,  माजी नगरसेवक लखन घोरपडे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख सुरेखा गुंजाळ, शहरप्रमुख संगिता गायकवाड, युवासेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कांदळकर, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, संभव लोढा, प्रथमेश बेल्हेकर, राजू सातपुते, भाऊसाहेब हासे, दिपक साळुंखे, संतोष कुटे, ब्रम्हा खिडके, फैजल सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Add to the photo of Union Minister of State killed by Shiv Sainiks