फुकट्या प्रवाशांवर कारवाई
By Admin | Updated: July 21, 2014 00:27 IST2014-07-20T23:18:48+5:302014-07-21T00:27:30+5:30
अहमदनगर : फुकटात आणि सवलतीत द्या आम्ही काहीही घेतो, अशा वृत्तीचे प्रवाशी एस़टी़ बसमधूनही फुकट प्रवासाचा बेत आखतात़ तिकिटाचे पैसे मागितलेल्या वाहकालाही दमबाजीचे प्रकार घडतात़
फुकट्या प्रवाशांवर कारवाई
अहमदनगर : फुकटात आणि सवलतीत द्या आम्ही काहीही घेतो, अशा वृत्तीचे प्रवाशी एस़टी़ बसमधूनही फुकट प्रवासाचा बेत आखतात़ तिकिटाचे पैसे मागितलेल्या वाहकालाही दमबाजीचे प्रकार घडतात़ यातून महामंडळाचे मोठे नुकसान होते़ हे नुकसान टाळण्यासाठी आणि फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी महामंडळाने जूनमध्ये फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली़
विनातिकीट प्रवासाला आळा बसावा व महामंडळाचे नुकसान होऊ नये, यासाठी नगर विभागाचे एक मार्ग तपासणी पथक तयार करण्यात आले आहे़ या पथकामार्फत कोठेही आणि केव्हाही बस थांबऊन अचानक प्रवाशांकडील तिकीट तपासणी करण्यात येते़ ज्या प्रवाशांकडे तिकीट नसेल अशा प्रवाशांकडून तिकीटभाडे व दंड वसूल करण्यात येतो़ महामंडळाच्या वतीने जून महिन्यात विविध मार्गावर तपासणी करण्यात आली़ या तपासणीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या २९ प्रवाशांकडून तब्बल १० हजार ३०७ रुपये वसूल करण्यात आले असल्याचे विभाग नियंत्रक सवंत्सरकर यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)
एस़टी़बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी वाहकाकडून तिकीट घेऊनच प्रवास करावा व दंडात्मक कारवाई टाळावी़ त्यामुळे महामंडळाचे व प्रवाशांचेही नुकसान होणार नाही़
- सुरेश सवंत्सरकर,
विभाग नियंत्रक