नगर शहरात महापालिकेच्या भरारी पथकामार्फत कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:49 IST2020-07-03T12:48:52+5:302020-07-03T12:49:37+5:30
अहमदनगर शहरात महापालिका व पोलीस प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भरारी पथकामार्फत कारवाई सुरू केली आहे. यासाठी महापालिकेने विविध पथकांची स्थापना केली आहे.

नगर शहरात महापालिकेच्या भरारी पथकामार्फत कारवाई सुरू
अहमदनगर : शहरात महापालिका व पोलीस प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भरारी पथकामार्फत कारवाई सुरू केली आहे. यासाठी महापालिकेने विविध पथकांची स्थापना केली आहे.
मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणाºयांविरोधात ही कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने सावेडी नगर शहर झेंडीगेट आणि कुरुडगाव प्रभात कार्यालयाअंतर्गत चार भरारी पथके नेमलेले आहेत. या पथकासोबत आता प्रत्येकी एक पोलीस कर्मचारीही देण्यात आला आहे. महापालिका व पोलीस पोलिसांच्या पथकाने शहरातील ठिकाणी फिरून नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
नगर शहरातील सावेडी प्रभाग कार्यालयाच्या पथकाने दुपारपर्यंत १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. इतर प्रभाग कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर शहरातील सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणाºयांना तंबी देण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे भरारी पथकाचे शशिकांत नजान यांनी सांगितले.