फेसबुकवर महिलेची बदनामी करणा-या आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:29 IST2020-07-10T17:28:58+5:302020-07-10T17:29:39+5:30
फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करुन महिलेची बदनामी करणा-या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली. गणेश पांडुरंग गायकवाड (वय ३०, रा. सिद्धार्थनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

फेसबुकवर महिलेची बदनामी करणा-या आरोपीला अटक
अहमदनगर : फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करुन महिलेची बदनामी करणा-या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली. गणेश पांडुरंग गायकवाड (वय ३०, रा. सिद्धार्थनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गायकवाड याने १३ एप्रिल रोजी नगर शहरातील एका महिलेच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले होते. या अकाउंटच्या माध्यमातून त्याने सदर महिलेचा भाऊ व मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून चॅटींग केली तसेच महिलेचा तिच्या मैत्रिणीसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला. याबाबत सदर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपीची माहिती घेऊन त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. वैयक्तिक रागातून हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.