शिक्षकाचा अपघाती मूत्यू; नगर-पुणे रोडवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:38 IST2020-06-02T13:47:27+5:302020-06-02T14:38:54+5:30
मांडवे (ता.नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अशोक जाधव (वय ५०, रा.पळवे खुर्द, ता.पारनेर) यांचे मोटारसायकल अपघातात रविवारी निधन झाले.

शिक्षकाचा अपघाती मूत्यू; नगर-पुणे रोडवरील घटना
पळवे : मांडवे (ता.नगर) येथील शाळेतील शिक्षक अशोक जाधव (वय ५०, रा.पळवे खुर्द, ता.पारनेर) यांचे मोटारसायकल अपघातात रविवारी निधन झाले.
काकासाहेब म्हस्के मांडवे येथील विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून ते सेवेत होते. मांडवे शाळेतील कोरोना विलगीकरण कक्षातून शनिवारी कर्तव्यावरून पळवे येथे आपल्या गावाकडे जात असताना नगर-पुणे महामार्गावर शनिवारी सायंकाळच्या दरम्यान कायनेटिक चौकात अपघात झाला.
अज्ञात वाहनाच्या धडकेने अशोक जाधव यांना पायाला जबर मार लागला. यानंतर अहमदनगर येथून सुपा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.