अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एक जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:08 IST2021-02-03T17:07:02+5:302021-02-03T17:08:11+5:30

राहाता तालुक्यातील एका गावात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना २४ जानेवारीला सांंयकाळी ४ वाजेदरम्यान घडली. याबाबत या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मंगळवारी (२ फेब्रुवारी) लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी एका ३३ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

Abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एक जण ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एक जण ताब्यात

लोणी : राहाता तालुक्यातील एका गावात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना २४ जानेवारीला सांंयकाळी ४ वाजेदरम्यान घडली. याबाबत या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मंगळवारी (२ फेब्रुवारी) लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी एका ३३ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

जालिंदर तुळशिराम वांगे (वय ३३, रा.राऊतवस्ती, निर्मळपिंप्री, ता.राहाता) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २४ जानेवारी या दिवशी सांयकाळी चार वाजण्याच्या सुमारास पिडीत अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याने तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Abuse of a minor girl