अबब... पळवेत एकाच झाडाला चारशे नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:16+5:302021-03-16T04:21:16+5:30
पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या नारळाच्या झाडाला चारशे नारळ आले आहेत. या परिसरात हा औत्सुक्याचा ...

अबब... पळवेत एकाच झाडाला चारशे नारळ
पळवे : पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या नारळाच्या झाडाला चारशे नारळ आले आहेत. या परिसरात हा औत्सुक्याचा विषय ठरला असून, आजूबाजूचे लोक हे नारळ पाहण्यासाठी येत आहेत.
पळवे बुद्रुक येथील महेंद्र पळसकर यांच्या घरासमोरील बागेत अनेक नारळाची झाडे आहेत. प्रत्येक झाडाला दरवर्षी चांगली फळे येतात. यावर्षी मात्र एका झाडाला चारशे नारळाची फळे आली आहेत. नारळांमुळे झुकलेल्या झाडाला लाकडाचा टेकू द्यावा लागला आहे. हे झाड पाच वर्षांपूर्वी लावलेले आहे. यंदा प्रथमच त्याला फळ धरले आहे. झाडाला सर्वप्रकारची पोषक द्रव्ये देऊन भरपूर पाणी दिले जाते, असे शेतकरी महेंद्र पळसकर यांनी सांगितले. तसेच यापेक्षाही अधिक फळे या नारळाला लागली होती. परंतु, बरीच फळे गळल्याचेही त्यांनी सांगितले.
----
१६ पळवे नारळ
पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक येथे चारशे नारळ लगडलेले झाड.
---