आरेचे मनुष्यबळ अन्न औषध प्रशासनाला देणार -राधाकृष्ण विखे पाटील
By अण्णा नवथर | Updated: June 15, 2023 17:47 IST2023-06-15T17:46:28+5:302023-06-15T17:47:07+5:30
हे मनुष्यबळ अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

आरेचे मनुष्यबळ अन्न औषध प्रशासनाला देणार -राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर: राज्यात दूध भेसळची अनेक प्रकरने पुढे येत आहेत. दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे आरेचे मनुष्यबळ अन्न औषध प्रशासनाकडे लवकरच वर्ग केले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अहमदनगरसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये दुधात भेसळ होते. मागील काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यात दूध संकलन केंद्रावर छापा टाकला असता 60 हजार लिटर दूध भेसळीचे आढळून आले. याबाबत पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दूध भेसळ रोखण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाची आहे. परंतु या विभागाकडे पुरेशी मनुष्यबळ नाही. त्यामुळे आरे चे उत्पादन कमी झाल्याने मनुष्यबळ अतिरिक्त ठरत आहे. हे मनुष्यबळ अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.