आमीर खान करणार पाथर्डीतील जोगेवाडीत श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 16:34 IST2018-04-10T16:33:30+5:302018-04-10T16:34:28+5:30
अभिनेते आमीर खान पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडीत दाखल झाले असून गावक-यांसमवेत थोड्यात वेळात श्रमदान करणार आहेत. जोगेवाडीत ७ एप्रिलपासून पाणी फौंडेशनच्या माध्यमातून काम सुरु करण्यात आले आहे.

आमीर खान करणार पाथर्डीतील जोगेवाडीत श्रमदान
अहमदनगर : अभिनेते आमीर खान पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडीत दाखल झाले असून गावक-यांसमवेत थोड्यात वेळात श्रमदान करणार आहेत. जोगेवाडीत ७ एप्रिलपासून पाणी फौंडेशनच्या माध्यमातून काम सुरु करण्यात आले आहे. दुपारी दीड वाजता पाथर्डी येथे हॅलीपॅडवर खान यांचे आगमन झाले. त्यानंतर तीन वाजता जोगेवाडीत दाखल झाले. उपसंरपच बाळासाहेब आधळे यांनी स्वागत केले.
आमीर खान यांच्यासमवेत किरण राव, बाळू शिंदे, प्रातांधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, ग्रामसेवक रोहिदास आघाव हेही श्रमदान करणार आहेत. टाळेबंद घर आणि श्रमदान घर ब्रीदवाक्यानुसार गावकरी श्रमदानासाठी बाहेर पडले आहे. गावाला तीनही तीनही बाजूने डोंगरे असल्याने सीसीटीचे कामे केली जाणार आहेत. एक हजाराचे पुढे ग्रामस्थ श्रमदान करत असून आमारी खानच्या उपस्थितीमुळे गावक-यांच्या उत्साहात भर पडणार आहे.