Ahmednagar: श्रीरामपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

By शिवाजी पवार | Updated: October 5, 2023 11:45 IST2023-10-05T11:44:45+5:302023-10-05T11:45:46+5:30

Crime News: श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेलच्या पाठीमागे किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. डोक्यात टणक वस्तूने मारल्याने रक्तस्त्राव होऊन तरुणाचा मृत्यू झाला.

A youth was killed in a petty dispute in Srirampur; Two suspects in police custody | Ahmednagar: श्रीरामपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar: श्रीरामपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

 - शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरातील संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेलच्या पाठीमागे किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. डोक्यात टणक वस्तूने मारल्याने रक्तस्त्राव होऊन तरुणाचा मृत्यू झाला. रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मयताचे नाव शाहरुख उस्मान शहा (वय २८, रा. बीफ मार्केट जवळ, श्रीरामपूर) असे आहे. संगमनेर रस्त्यावरील एका हॉटेलच्या पाठीमागे काही तरुण गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. त्यातून शाहरुखच्या डोक्यात टणक वस्तूने जबर मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यातून  रक्तस्राव झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले.

घटनेची माहिती समजतात मोठ्या प्रमाणात तरुणांनी शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी दोन संशियितांना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: A youth was killed in a petty dispute in Srirampur; Two suspects in police custody