कोपरगावात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 19:58 IST2023-02-27T19:58:03+5:302023-02-27T19:58:11+5:30

तालुक्यातील नाटेगाव येथील भक्ती सुरेश गायके ( वय १८ ) या तरुणीने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

A young woman committed suicide by hanging herself in Kopargaon | कोपरगावात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगावात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

रोहित टेके 

कोपरगाव : तालुक्यातील नाटेगाव येथील भक्ती सुरेश गायके ( वय १८ ) या तरुणीने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना सोमवारी (दि.२७) दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी नातेवाईकांच्या खबरीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. मृत तरुणी हि कोपरगाव शहरातील सद्गुरू गंगागीर महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान भक्ती हिने पित्ताशयाच्या दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक आंधळे करीत आहेत.

Web Title: A young woman committed suicide by hanging herself in Kopargaon