मोबाइल नंबर ब्लॉक केल्याने युवती आणि तिच्या मित्राला कोयता, लाकडी दांड्याने मारहाण

By शेखर पानसरे | Updated: October 25, 2023 15:36 IST2023-10-25T15:36:18+5:302023-10-25T15:36:42+5:30

या प्रकरणी मारहाण झालेल्या युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

A young girl and her friend were beaten up for blocking mobile numbers | मोबाइल नंबर ब्लॉक केल्याने युवती आणि तिच्या मित्राला कोयता, लाकडी दांड्याने मारहाण

मोबाइल नंबर ब्लॉक केल्याने युवती आणि तिच्या मित्राला कोयता, लाकडी दांड्याने मारहाण

संगमनेर : मोबाइल नंबर ब्लॉक केल्याच्या कारणावरून २७ वर्षीय युवती आणि तिच्या मित्राला कोयत्याने, लाकडी दांड्याने मारहाण केली.  यात युवती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२४) दुपारी २.४३ वाजेच्या सुमारास  संगमनेर शहरानजीक असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब जवळ घडली. या प्रकरणी मारहाण झालेल्या युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

    राजेश जंबूकर, वैभव दांदे (दोघांचेही पूर्ण नाव माहीत नाही, दोघेही रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. २७ वर्षीय युवती आणि तिचा मित्र हे दोघे घरी असताना राजेश जंबूकर आणि त्याचा मित्र वैभव दांदे तेथे गेले. ‘तू माझा मोबाइल नंबर ब्लॉक का केला’ या कारणावरून जंबूकर याने कोयत्याने युवतीचा दोन्ही हातांचे बोटावर आणि डोक्यावर मारून तिला गंभीर जखमी केले. मारहाणीत तिच्या हाताचे बोट फॅक्चर झाले. दांदे याने युवतीच्या मित्राच्या पायावर लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस हेड कॉस्टेबल ए. बी. धनवट अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: A young girl and her friend were beaten up for blocking mobile numbers