एक्सेल तुटल्याने परिवहन महामंडळाची बस उलटली; विद्यार्थी जखमी

By शेखर पानसरे | Updated: December 26, 2023 09:30 IST2023-12-26T09:30:13+5:302023-12-26T09:30:38+5:30

बसमधून प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागून जखमा झाल्या आहेत.

A transport corporation bus overturned after the axle broke; Student injured | एक्सेल तुटल्याने परिवहन महामंडळाची बस उलटली; विद्यार्थी जखमी

एक्सेल तुटल्याने परिवहन महामंडळाची बस उलटली; विद्यार्थी जखमी

- शेखर पानसरे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा एक्सेल तुटल्याने अपघात होऊन बस उलटली. हा अपघात मंगळवारी ( दि.२६) सकाळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरणे गावात झाला. या बसमधून मुख्यत्वे करून विद्यार्थी प्रवास करत होते, अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

बसमधून प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागून जखमा झाल्या आहेत. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे घटनास्थळी असून, स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी तातडीने पोहोचले.

किरकोळ जखमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरातील रुग्णालयात उपचारांसाठी पाठवलेले आहे. पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस पुढील तपास करत आहे. असेही उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांनी सांगितले.

Web Title: A transport corporation bus overturned after the axle broke; Student injured

टॅग्स :Accidentअपघात