संजीवनी पाॅलिटेक्निकचा निकाल ९९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:09+5:302021-09-07T04:26:09+5:30
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळाने जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या समसत्र परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. ...

संजीवनी पाॅलिटेक्निकचा निकाल ९९ टक्के
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळाने जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये घेतलेल्या समसत्र परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात संजीवनी के.बी.पी. पाॅलिटेक्निकचा संपूर्ण शैक्षणिक वर्षाचा ९९ टक्के लागला आहे, अशी माहिती प्राचार्य ए.आर. मिरीकर यांनी दिली.
प्रज्वल काकडे याने अंतिम वर्षात ९९.०९ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सिव्हिल इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षात प्राप्ती शेळके (९६.४७), वैभव शिंदे (९५.५८) व साक्षी घोडके (९५.७४) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये साईश भास्कर (९६.६२), गौरव जाधव (९६.५१) व ओम गायकवाड (९६.२६) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये साक्षी शेलार (९४.२८), प्रतीक लांडगे (९३.८३) व तुषार बांगर (८९.६१) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये आदित्य सोनवणे (९६.७५), विशाल रंधे (९५.२९) व नम्रता कसबे (९४.१८) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी स्नेहल होन (९८.३७), तेजस पडीयार (९७.७५) व मानसी भडके (९६.५०) तर काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजीमध्ये प्रज्वल काकडे (९९.०९), अथर्व राठी (९७.१४) व वैष्णवी पवार (९६.९७) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.