नगर शहरात कोरोनाचे ८८७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:21 IST2021-04-18T04:21:06+5:302021-04-18T04:21:06+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी २,१७१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ...

887 corona patients in the city | नगर शहरात कोरोनाचे ८८७ रुग्ण

नगर शहरात कोरोनाचे ८८७ रुग्ण

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी २,१७१ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ३३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. शनिवारी जिल्हयाच्या रुग्णसंख्येत ३,२८० ने वाढ झाल्याने, उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८,७२७ इतकी झाली आहे. नगर शहरातही कोरोना रुग्णांचा उच्चांक झाला असून, प्रथमच एकाच दिवशी ८८७ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७९८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८०८ आणि अँटिजेन चाचणीत १,६७४ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर शहर (८८७), नगर ग्रामीण (३४१), राहाता (२८०), कर्जत (२३६), श्रीरामपूर (१८९), राहुरी (१८६), संगमनेर (१८४), शेवगाव (१६४), कोपरगाव (१५२), अकोले (१३७), पारनेर (१०१), पाथर्डी (९८), नेवासा (९५), भिंगार (६८), इतर जिल्हा (५५), जामखेड (४८), श्रीगोंदा (४६), मिलिटरी हॉस्पिटल(१३), इतर राज्य (०) येथील रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३९ बाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.

----

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : १,१२,३३०

उपचार सुरू असलेले रुग्ण : १८,७२७

मृत्यू : १,४८०

एकूण रुग्णसंख्या : १,३२,५३७

Web Title: 887 corona patients in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.