सोनई गणासाठी 72 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:51 IST2019-06-23T18:51:30+5:302019-06-23T18:51:57+5:30
सोनई गणाची पोटनिवडणुकीसाठी १९ केंद्रावर ७२ टक्के मतदान शांततेत झाले. १८ हजार ६५६ पैकी १३ हजार ४५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सोनई गणासाठी 72 टक्के मतदान
सोनई : सोनई गणाची पोटनिवडणुकीसाठी १९ केंद्रावर ७२ टक्के मतदान शांततेत झाले. १८ हजार ६५६ पैकी १३ हजार ४५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांनी मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी आपल्या सभापती पदासह सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही जागा रिक्त झाल्यामुळे पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.
सकाळी नऊ वाजेपर्यत मतदान केद्रावर गर्दी कमी होती. मात्र दुपारी १२ ते ३ वाजेपर्यत मतदारांनी मतदान केद्रावर गर्दी केली होती. क्रांतिकारी पक्षाचे उमेद्वार कारभारी डफाळ व भाजपाचे उमेदवार प्रकाश शेटे यांनी मतदान केद्रावर येऊन मतदान केले.
सोनई गणामध्ये सोनई व शनी शिंगणापूर गावाचा समावेश आहे. मतदानासाठी १९ केंद्रावर ११४ अधिकारी व कर्मचारी व ३२ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.