मारहाण करून ७० हजारांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST2021-02-11T04:23:09+5:302021-02-11T04:23:09+5:30

---------- ग्रामपंचायत कार्यालयातून बॅटरी चोरल्या अहमदनगर: नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयातून चोरट्यांनी १५ हजार रुपयांच्या बॅटऱ्या चोरून नेल्या. ४ ...

70,000 was stolen by beating him | मारहाण करून ७० हजारांचा ऐवज लांबविला

मारहाण करून ७० हजारांचा ऐवज लांबविला

----------

ग्रामपंचायत कार्यालयातून बॅटरी चोरल्या

अहमदनगर: नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायत कार्यालयातून चोरट्यांनी १५ हजार रुपयांच्या बॅटऱ्या चोरून नेल्या. ४ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ग्रामविकास अधिकारी रामभाऊ मुरलीधर आबूज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड कॉस्टेबल नगरे हे पुढील तपास करत आहेत.

------------

वीजपंपासह पाईप चोरले

अहमदनगर: नगर तालुक्यातील वाकोडी येथून चोरट्यांनी पाण्याचा वीजपंप व पाईप चोरून नेले. ९ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अशोक पांडुरंग भुसार यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार मुळे हे पुढील तपास करत आहेत.

-------------

अविनाश देडगावकर यांचा सन्मान

अहमदनगर : नगर शहरातील विविध चौकात ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करत गेली अनेक वर्षे समाजसेवा करणारे अविनाश देडगावकर यांचा स्नेहालयाच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. देडगावकर यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. नगर शहरात वाढत्या वाहनांसह वाहतूककोंडीचेही प्रमाण वाढले आहे. देडगावकर हे सकाळी दहा ते रात्री ७ या वेळेत शहरातील विविध चौकात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतात. त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

फोटो १० अविनाश देडगावकर

Web Title: 70,000 was stolen by beating him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.