श्रीरामपूर तालुक्यात ६५० कर्मचारी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:08+5:302021-01-15T04:18:08+5:30

तालुक्यातील २६६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्याकरिता ५७७ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील एकमेव खानापूर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार ...

650 employees deployed in Shrirampur taluka | श्रीरामपूर तालुक्यात ६५० कर्मचारी तैनात

श्रीरामपूर तालुक्यात ६५० कर्मचारी तैनात

तालुक्यातील २६६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्याकरिता ५७७ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील एकमेव खानापूर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. १३० मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडणार आहे. त्याकरिता प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई अशा पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, तरीही बेलापूर, कारेगाव, वडाळा महादेव, टाकळीभान येथे निवडणुकीत तीव्र संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर पुरविण्यात आले आहे. मात्र, कोविडवरील उपाययोजना म्हणून विशेष अशी यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही.

------------

Web Title: 650 employees deployed in Shrirampur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.