पारनेर तालुक्यात ६४ माध्यमिक शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:15+5:302021-02-13T04:21:15+5:30
कोरोनाच्या महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारने माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत. पारनेर तालुक्यात १ फेब्रुवारीपासून ६४ शाळा सुरू ...

पारनेर तालुक्यात ६४ माध्यमिक शाळा सुरू
कोरोनाच्या महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारने माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत. पारनेर तालुक्यात १ फेब्रुवारीपासून ६४ शाळा सुरू झाल्या आहेत. सुमारे दोन हजार शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्या निगेटिव्ह आल्यानंतर शिक्षक शाळेत हजर झाले. पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी शुक्रवारी मुख्याध्यापकांची बैठक घेतली. पारनेरचे प्राचार्य मुकुंद जासूद, निघोजचे प्राचार्य रामचंद्र सुपेकर, मुख्याध्यापक संतोष ठाणगे यांच्यासह ५० ते ५५ प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.
....
प्रत्येक विद्यार्थ्यांची गृहभेट घ्या
कोरोना महामारीनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पाचवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थी व त्यांचे पालक आरोग्याची काळजी घेतात का? हे तपासणीसाठी गृहभेट दिली पाहिजे. यातून त्यांच्या आरोग्यविषयक माहिती उपलब्ध होईल अशा सूचना गटशिक्षणाधिकारी बुगे यांनी दिल्या.