चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 05:27 IST2025-05-03T05:26:05+5:302025-05-03T05:27:05+5:30
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी चोंडी येथे बैठकीचा आग्रह धरला होता. २९ एप्रिल रोजी ही बैठक होणार होती. नंतर ६ मे तारीख ठरली.

चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ दाखल होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करत चोंडी येथे तयारीचा आढावा घेतला.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी चोंडी येथे बैठकीचा आग्रह धरला होता. २९ एप्रिल रोजी ही बैठक होणार होती. नंतर ६ मे तारीख ठरली. जिल्हा प्रशासनाकडून ६०० व्हीव्हीआयपी आणि इतर दोन हजार लोकांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि व्हीव्हीआयपी यांच्या भोजनाची व्यवस्था बचत गटातील महिलांकडे देण्यात आली आहे. यामध्ये खास अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पदार्थ बनविले जाणार आहेत.