६0 हजार तोडणी कामगार स्थलांतरि त
By Admin | Updated: November 24, 2014 13:16 IST2014-11-24T13:16:02+5:302014-11-24T13:16:09+5:30
शेवगाव तालुक्यात यंदा पुरेशा पावसाअभावी दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सुमारे ५0 ते ६0 हजार कामगार राज्यासह परराज्यात कामासाठी स्थलांतरीत झाले आहेत.

६0 हजार तोडणी कामगार स्थलांतरि त
प्रतिकूल परिस्थिती: पावसाअभावी दुष्काळीस्थिती
बोधेगाव : शेवगाव तालुक्यात यंदा पुरेशा पावसाअभावी दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जनावरांच्या चार्याचा प्रश्न सुटून डोक्यावरील कर्जाचा बोजा काही प्रमाणात हलका होईल, या विचाराने ऊसतोड मजुरांच्या संख्येत यंदा मोठी वाढ झाली आहे. सुमारे ५0 ते ६0 हजार कामगार राज्यासह परराज्यात कामासाठी स्थलांतरीत झाले आहेत. गतवर्षी ४0 हजार मजूर स्थलांतरीत झाले होते.
शेवगाव तालुक्यात खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने व यंदा समाधानकारक पाऊसच न झाल्याने शेतीचे गणित कोलमडले आहे. काही ठिकाणी खरीप पेरणी झाली नाही तर अनेक ठिकाणी दुबार, तिबार पेरणीच्या संकटाचा शेतकर्यांना सामना करावा लागला. एवढे करूनही काही प्रमाणात हाती घेतलेल्या बाजरी, कापसाच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली. हाती आलेल्या पिकाचा उत्पादनाचा दर्जा चांगला नसल्याने बाजारात दरही चांगला मिळेनासा झाला आहे. परतीचा पाऊस साथ देईल, असा अंदाज बांधून तालुक्यात रब्बी ज्वारीचीही मोठय़ा प्रमाणावर पेरणी होते. त्यातून चार्याचा प्रश्न मार्गी लागतो. यंदा ज्वारीच्या पेरणीत मोठी घट झाली. खरीपात कपाशी, बाजरी, तूर आदी पिकाच्या पेरणीसाठी झालेला मोठा खर्च आणि अत्यल्प उत्पादन यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे.
दुपटीने वाढ
■ ऊस तोडणीसाठी जाणार्यांच्या संख्येत यंदा तब्बल दुप्पटीने भर पडली आहे. यामध्ये बोधेगाव भागातील जिरायत डोंगर पट्टय़ातील ऊसतोड मजुरांची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षी तालुक्यातून ऊस तोडणीसाठी सुमारे ४0 हजार मजूर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्याच्या विविध भागात गेले होते. यंदा आतापर्यंत सुमारे ५0 ते ६0 हजार मजूर महिभरात स्थलांतरीत झाले आहेत.
(वार्ताहर)