दामदुप्पटच्या आमिषाने ६ कोटी ८१ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST2021-01-15T04:19:03+5:302021-01-15T04:19:03+5:30

नेवासा : तालुक्यातील सोनई व परिसरात चार संस्थांची नावे घेत एका वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेक लाभधारकांना ...

6 crore 81 lakhs due to double lure | दामदुप्पटच्या आमिषाने ६ कोटी ८१ लाखांना गंडा

दामदुप्पटच्या आमिषाने ६ कोटी ८१ लाखांना गंडा

नेवासा : तालुक्यातील सोनई व परिसरात चार संस्थांची नावे घेत एका वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेक लाभधारकांना सहा कोटी ८१ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याबाबतच्या फिर्यादीवरून सहा जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सोनई व परिसरातील अनेक तक्रारदारांच्या वतीने अण्णासाहेब मिठ्ठू दरंदले (रा. सोनई) यांनी ही फिर्याद दिली आहे. विष्णू रामचंद्र भागवत (रा. दवंडगाव, जि. नाशिक), नीलेश जर्नादन कुंभार (रा. मंचर, जि. पुणे), सुरेश सीताराम घंगाडे (रा. तळेगाव, जि. पुणे), राजेंद्र वामन देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे (रा. कोतूळ, ता. अकोले), शांताराम अशोक देवतरसे (रा. सोनई, ता. नेवासा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुळा कारखाना परिसरातील अंजनी हॉटेल, संकेत हाॅटेल (आळेफाटा) व शिर्डी येथे बैठक घेऊन उज्ज्वलम ॲग्रो, माउली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी इंडिया प्रा. लि., प्राॅफिट टीचर फ्लाय हाॅलिडे या संस्थेचे नाव सांगून एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे आमिष दाखविण्यात आले. विमान प्रवासाने सहल व जमिनीचे आश्वासन देण्यात आले. संबंधितांनी २०१७ ते २०१९ दरम्यान पैसे जमा करून नेले.

मोठी लालूच दाखवत संबंधितांनी योजनेचा प्रसार करण्यासाठी या भागातील काही प्रमुख व्यक्तींना हाताशी धरले होते. चार कंपनींच्या हस्तकांनी सोनई व परिसरातून मोठी रक्कम जमा करून नेली. एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे आमिष असल्याने अनेकांनी यात पैसे गुंतवले होते. वर्ष उलटूनही रक्कम मिळाली नसल्याने सर्वांचेच धाबे दणाणले. पैसे मिळायची शक्यता नसल्याने अखेर फिर्याद दाखल करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पुढील तपास करत आहेत.

Web Title: 6 crore 81 lakhs due to double lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.