नगर जिल्ह्यात आज ५६६ नवे कोरोनाबाधीत रुग्ण; ४२४ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 20:43 IST2020-08-23T20:43:18+5:302020-08-23T20:43:50+5:30
अहमदनगर जिल्ह्यात आज (२३ आॅगस्ट) ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने वाढ झाली.

नगर जिल्ह्यात आज ५६६ नवे कोरोनाबाधीत रुग्ण; ४२४ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
अहमदनगर : जिल्ह्यात आज (२३ आॅगस्ट) ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणा-या रुग्णांची संख्या आता ३३६५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९८, अँटीजेन चाचणीत २३४ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३४ रुग्ण बाधीत आढळले.
एकूण बरे झालेल्या रुग्णसंख्या १३ हजार ४७८ झाली आहे. तर सध्या ३ हजार ३६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १७ हजार ७४ हजार झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.