नगर जिल्ह्यात २४ तासात ५५९ कोरोनाच्या रुग्णांची नोंद; ३६८ रुग्णांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 20:34 IST2020-08-07T20:33:22+5:302020-08-07T20:34:18+5:30
अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी (६ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी (७ आॅगस्ट) सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ५५९ ने वाढ झाली.

नगर जिल्ह्यात २४ तासात ५५९ कोरोनाच्या रुग्णांची नोंद; ३६८ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी (६ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी (७ आॅगस्ट) सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ५५९ ने वाढ झाली. यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले. यामुळे उपचार सुरू असणा-या रुग्णांची संख्या आता ३ हजार१६५ इतकी झाली आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५ हजार ३३३ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६२.०५ टक्के इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव १, मनपा ५, नगर ग्रामीण ३, कॅन्टोन्मेंट ६, शेवगाव १, राहुरी १ , कर्जत १, नेवासा १, पारनेर २ श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत शुक्रवारी ३२१ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये मनपा ५०, संगमनेर ३४, राहाता १०, पाथर्डी ३१, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर १०, कॅन्टोन्मेंट १८, नेवासा १९, श्रीगोंदा २३, पारनेर १२, अकोले ५, राहुरी ४, शेवगाव २४, कोपरगाव ३२, जामखेड ९ आणि कर्जत २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१६ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मनपा १६५, संगमनेर ११, राहाता २, पाथर्डी ५, नगर ग्रामीण ७, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट १, नेवासा ५, श्रीगोंदा ३, पारनेर २, अकोले ६, राहुरी १, कोपरगाव ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३२, राहाता ७, पाथर्डी १९, नगर ग्रामीण१३, श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११,राहुरी १, शेवगाव २, कोपरगाव १७, जामखेड २, कर्जत १५.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ८ हजार ५९४ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ९६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.