घाटशिरसमध्ये ५० जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST2021-04-19T04:19:05+5:302021-04-19T04:19:05+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गावात सध्या ५० ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने ...

50 injured in Ghatshiras | घाटशिरसमध्ये ५० जण कोरोनाबाधित

घाटशिरसमध्ये ५० जण कोरोनाबाधित

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गावात सध्या ५० ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने हे गाव आता तालुका प्रशासनाने कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. त्याचबरोबर या गावात आरोग्य विभागामार्फत शुक्रवारी कोरोना तपासणी चाचणीचा कॅम्प घेण्यात आला. यामध्ये पन्नास नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आल्याची माहिती सरपंच गणेश पालवे व विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांनी दिली. कॅम्पमध्ये आरोग्य सेविका स्नेहल पालवे, वैद्य, आरोग्यसेवक कांबळे, सईद डफेदार, ग्रामसेविका सुवर्णा भापकर, ग्रामपंचायत कर्मचारी विजय शिंदे, राजू पळसकर, प्रवीण तुपे, लक्ष्मीकांत अकोलकर सहभागी झाले होते.

Web Title: 50 injured in Ghatshiras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.