३६३ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST2021-04-07T04:21:28+5:302021-04-07T04:21:28+5:30

सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत कलम ६ (३) (१) नुसार नजीकच्या शाळांच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत अशा ...

363 students will get travel allowance | ३६३ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता

३६३ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता

सक्तीचा शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत कलम ६ (३) (१) नुसार नजीकच्या शाळांच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत अशा वस्त्यांमधील ६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मोफत परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येते; मात्र जेथे एस.टी.ची सुविधा नाही तेथे केंद्र शासनाकडून वाहतुकीकरिता प्रति विद्यार्थी दर महिन्याला ३०० रुपये असे १० महिन्यांसाठी तीन हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येते. यावर्षी मात्र कोरोनामुळे विद्यार्थ्यांना १० महिन्यांऐवजी केवळ दोन महिन्यांचा वाहतूक भत्ता मिळणार आहे. कारण पाचवी ते आठवी या शाळा केवळ फेब्रुवारी आणि मार्च असे दोनच महिने सुरू होत्या. चौथीपर्यंतच्या शाळा तर सुरू झाल्याच नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अनुदान मिळणार नाही.

---------------

कोरोनामुळे दोनच महिन्यांचा भत्ता

वर्षभराचा हा भत्ता मिळण्यासाठी शाळेत ५० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे; मात्र यंदा सर्वच शाळा बंद होत्या. केवळ पाचवी ते आठवीचे वर्ग फेब्रुवारी आणि मार्च असे दोनच महिने सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ दोन महिन्यांचे अनुदान मिळणार असून ते त्यांच्या आईच्या खात्यावर जमा होईल.

---------------------

सव्वादोन लाखांची तरतूद

जिल्ह्यातील ३६३ विद्यार्थी भत्त्यासाठी पात्र असून, त्यांना दरमहा ३०० रुपये असे दोन महिन्यांकरिता ६०० रुपयांप्रमाणे २ लाख १७ हजार ८०० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे; मात्र अद्याप हे पैसे शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत.

-----------

तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या

अकोले - ३०५

नगर - १९

पाथर्डी -४

राहाता - ११

राहुरी -१५

संगमनेर -९

----------

एकूण - ३६३

---

नेट फोटो-

०२ समग्र शिक्षा अभियान डमी

शिक्षा

Web Title: 363 students will get travel allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.