१६४ जागांसाठी तब्बल ३१ हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 20:01 IST2018-03-04T19:22:28+5:302018-03-04T20:01:00+5:30

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीसाठी जिल्ह्यात १६४ जागा असून, त्यासाठी एकूण ३१ हजार ७३ अर्ज आले आहेत. १२ मार्च पासून मैदानी चाचणी होणार आहे.

 31 thousand applications for 164 seats | १६४ जागांसाठी तब्बल ३१ हजार अर्ज

१६४ जागांसाठी तब्बल ३१ हजार अर्ज

ठळक मुद्देअहमदनगरमधील पोलीस शिपाई भरती १२ मार्चपासून मैदानी चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीसाठी जिल्ह्यात १६४ जागा असून, त्यासाठी एकूण ३१ हजार ७३ अर्ज आले आहेत. १२ मार्च पासून मैदानी चाचणी होणार आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यात एकाच वेळी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात एकूण १६४ जागा असून, महिलांसाठी ४९ जागा राखीव आहेत. अर्ज दाखल करण्याच्या ३ मार्च या अखेरच्या दिवशी ३१ हजार ७३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या भरतीत मोठी स्पर्धा पहावयास मिळणार आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर भरतीच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी १२ मार्चपासून मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये १०० गुण मैदानी चाचणीला तर लेखी परीक्षेसाठी १०० गुण राहणार आहेत.

Web Title:  31 thousand applications for 164 seats