आचारसंहिता भंगाचे ३१ गुन्हे दाखल

By Admin | Updated: October 9, 2014 00:12 IST2014-10-09T00:10:56+5:302014-10-09T00:12:20+5:30

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता भंगाचे ३१ गुन्हे दाखल झाले असून, बारा मतदारसंघातून २६ तक्रारी दाखल झाल्या आहेत़

31 Code of Conduct violation code | आचारसंहिता भंगाचे ३१ गुन्हे दाखल

आचारसंहिता भंगाचे ३१ गुन्हे दाखल

अहमदनगर: विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता भंगाचे ३१ गुन्हे दाखल झाले असून, बारा मतदारसंघातून २६ तक्रारी दाखल झाल्या आहेत़ त्यामुळे विविध राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांना चांगलाच चाप बसला आहे़
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे़ राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे़ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत़ उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून विरोधकांना लक्ष्य केले जाऊ लागले आहे़ काही ठिकाणी हाणामारी व बेकायदा जमाव जमविण्याच्या घटना घडल्या आहेत़ तसेच विना परवाना प्रचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे ३१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ शेवगाव मतदारसंघात विना परवाना पक्षाचे चिन्ह लावून वाहन फिरविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ श्रीगोंदा मतदारसंघात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भाजपाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे़ शहरातील सेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्र्रचारार्थ गांधी मैदान येथे झालेल्या सभेत मुद्रक व प्रकाशक नसलेले हातपंखे आढळून आल्याने राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भगवानगडावर धार्मिक मेळावा आयोजित करण्यात आला होता़ मात्र त्याठिकाणी राजकीय व्याख्याने दिल्याने आचारसंहिता भंग झाला असून,याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याशिवाय विना परवाना प्रचाराची वाहने फिरविणे,गावठी पिस्तूल बाळगणे, पत्रकांवर मुद्रक व प्रकाशकाचे नाव न टाकणे, कार्यकर्त्यांना जातीय वाचक शिवीगाळ करणे, यासारखे प्रकार आढळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ बारा मतदारसंघातून विविध राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात २६ तक्रारी दाखल झाल्या असून, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)
आचारसंहिता कक्षाकडे तक्रारी
राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रचारात विना परवाना साहित्याचा वापर केला जात आहे़ याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असून, आतापर्यंत २६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ जिल्हा परिषदेने आचारसंहिता लागू असताना विविध विकास कामांच्या निविदा नोटीस प्रसिध्द केल्याबाबतचीही तक्रार प्राप्त झाली असून, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत़ निवडणूक शाखेने नियुक्त केलेल्या भरारी पथकाकडून कारवाया करण्यात येत आहेत़
अजित पवारांनी फाईल फेकली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घोड-कुकडी व साकळाईच्या सिंचनाची फाईल घेऊन गेलो. ते म्हणाले की, आमची बारामती ५८ टक्के सिंचनाखाली आहे आणि तुमचा तालुका ७२ टक्के सिंचनाखाली आहे. आता कशाला पाणी हवंय? असं सांगून फाईल माझ्या अंगावर फेकली. स्वाभिमान दुखावल्यानेच आपण विचार बदलला, असे पाचपुते म्हणाले.
कर्डिले यांची उपस्थिती
आ.शिवाजी कर्डिले यांनी प्रथमच पाचपुते यांच्या प्रचारात सहभाग घेतला. ते म्हणाले की, कुठलेच समज-गैरसमज न करता माझे कार्यकर्ते पाचपुतेंच्या पाठीशी उभे राहतील. अजित पवार यांनी षडयंत्र करून मला खोट्या गुन्ह्यात अडकवले, असे कर्डिले यांनी स्पष्ट केले.

Web Title: 31 Code of Conduct violation code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.