नगर जिल्ह्यात २६३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह; ३७९ रुग्णांना सोडले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:00 IST2020-12-02T12:59:28+5:302020-12-02T13:00:24+5:30
नगर जिल्ह्यात मंगळवारी २६३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ३७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४९४ इतकी झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने सांगितले.

नगर जिल्ह्यात २६३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह; ३७९ रुग्णांना सोडले घरी
अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी २६३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर ३७९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४९४ इतकी झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेने सांगितले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१ आणि अँटिजेन चाचणीत १६१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (६१), जामखेड (८), कोपरगाव (१२), नगर ग्रामीण (११), पारनेर (१२), शेवगाव (१०),श्रीगोंदा (१५), श्रीरामपूर (२८), इतर जिल्हा (१), अकोले (१३), कर्जत (६), नेवासा (९), पाथर्डी (१९), राहाता (७), राहुरी (१३), संगमनेर (३७), कन्टोन्मेंट (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी घरी सोडलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३३, अकोले ३१, जामखेड १३, कर्जत १५, कोपरगाव १७, नगर ग्रामीण ४, नेवासा ३०, पारनेर २७, पाथर्डी ३५, राहाता २९, राहुरी २०, संगमनेर ६९, शेवगाव १९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट ७ आणि मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या ही ६१२४४ इतकी असून १४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णसंख्या ६३ हजार ६७२ इतकी झाली आहे.