शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात दुसऱ्या दिवशी २६ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST

केडगाव : नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) ९ गावांतून २६ उमेदवारी अर्ज दाखल ...

केडगाव : नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) ९ गावांतून २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण २९ अर्ज दाखल असून, पोखर्डीतून सर्वाधिक ८ अर्ज दाखल झाले आहेत, तर ५० गावांतून अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही.

नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे कामकाज नगर तहसील कार्यालयात सुरू आहे. तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३० निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी दुसरा दिवस होता. गुरुवारी ९ गावांतून एकूण २६ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत आलेल्या अर्जांची संख्या २९ झाली आहे. अजूनही बहुतांश इच्छुक कागदपत्रांची माहिती घेणे, जुळवाजुळव करण्यात व्यस्त दिसले. उमेदवारी अर्जासोबत तब्बल १७ प्रकारची कागदपत्रे जोडावी लागत असल्याने इच्छुक उमेदवार याच धावपळीत होते.

................

गावनिहाय उमेदवारी अर्ज

पोखर्डी - ८,

देहरे - ५, इसळक -१, चास -१,

खारेकर्जुने- ७, शिंगवे नाईक - १, शहापूर - १, दश्मी गव्हाण - ४, उदरमल - १.

................

तीन दिवस सलग सुटी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली असली तरी शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस शासकीय सुटी असल्याने या दिवशी निवडणुकीचे कामकाज बंद राहणार आहे. यामुळे सोमवारनंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

................

कागदपत्रांची क्लिष्टता

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला तब्बल १७ प्रकारचे कागदपत्र अर्जासोबत जमा करणे बंधनकारक असल्याने या कागदपत्रांची जमवाजमव करण्यात उमेदवारांची धावपळ होत असून काही कागदपत्रे क्लिष्ट असल्याने इच्छुकांची दमछाक होत आहे.