अहमदनगर: सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत रस्ते, पाणी आणि वीज पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे़ जपानमधील उद्योग समूहासाठी उभारण्यात येणाऱ्या पार्कचा यात समावेश असून, त्याठिकाणी पुरविल्या जाणाऱ्या सुविधासाठी हा आराखडा असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले़सुपा- पारनेर औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्याचा निर्णय झाला आहे़ या वसाहतीत जपानी कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे़ औद्योगिक विकास महामंडळाचे प्रमुख अधिकारी मध्यंतरी जपान दौऱ्यावर गेले असता त्यांनी जपानी उद्योजकांशी याबाबत चर्चा केली़ त्यावेळी तेथील उद्योजकांनी सुपा येथे गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली आहे़ वरिष्ठ स्तरावर उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ परंतु भूसंपादनाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही़ काही शेतकऱ्यांनी जमिनी देण्याची तयारी दर्शविली असून, त्यावर सुनावणी घेण्याचे काम सुरू आहे़ असे असले तरी औद्योगिक विकास महामंडळाने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत़ नव्याने जपानी उद्योग असल्यास त्यांना कोणत्या सुविधा पुरवाव्या लागतील, त्यासाठी किती खर्च येईल, याचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ नव्याने येणाऱ्या उद्योजकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च लागणार असून, तसा आराखडाही तयार केला जात आहे़जपानी कंपन्यांबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे़ त्यादृष्टीने प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ रस्त्यांची निर्मिती करणे, वाहनतळ उभारणे, पाणीपुरवठा करणे, वृक्षांची लागवड करणे, यासारख्या सुविधांचा हा आराखडा असणार आहे़ येथील औद्योगिक विकास महामंडळाकडून तो तयार केला जाणार आहे़ सध्या पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जुनी झाली आहे़ त्यामुळे ती वारंवार नादुरुस्त होते़ यावर मात करण्यासाठी उपकेंद्राचा पर्याय समोर आला आहे़ तसा आराखडाही तयार करण्यात आला आहे़ हा आराखडा तयार करून वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार आहे़ त्यासाठी भूसंपादन करावे लागेल़ सुपा औद्योगिक वसाहतीसाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे़ त्यामुळे हा पर्याय निवडला जात आहे़ अर्थात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा आराखडा प्रत्यक्षात येऊ शकेल,असे सूत्रांकडून सांगण्यात आले़ उद्योजकांच्या आशा पल्लवितपार्कमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठीचा आराखडा तयार असून सुपा येथे मोठ्या कंपन्या आल्यास स्थानिक उद्योजकांना काम मिळेल, असे काही उद्योजकांनी याविषयी माहिती देताना सांगितले़
सुपा औद्योगिक पार्कचा २५० कोटींचा आराखडा
By admin | Updated: July 30, 2014 00:46 IST
अहमदनगर: सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीत रस्ते, पाणी आणि वीज पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे़
सुपा औद्योगिक पार्कचा २५० कोटींचा आराखडा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}