अकोलेमध्ये पिकअप पलटी होऊन भीषण अपघात, 22 ते 25 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 12:37 IST2018-08-27T12:36:45+5:302018-08-27T12:37:38+5:30

अकोले राजूर रस्त्याच्या एका वळणावर पिकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  22 ते 25 जण जखमी झाले आहेत.

25 passengers injured in road accident near akole | अकोलेमध्ये पिकअप पलटी होऊन भीषण अपघात, 22 ते 25 जण जखमी

अकोलेमध्ये पिकअप पलटी होऊन भीषण अपघात, 22 ते 25 जण जखमी

अकोले (जि. अहमदनगर ) : रुंभोडी शिवारात विठे घाटाच्या सुरुवातीला अकोले राजूर रस्त्याच्या एका वळणावर पिकअप पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  22 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी (27 ऑगस्ट) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात घडला. विठे ठाकरवाडी येथून कामगारांना घेऊन पिकअप गाडी इंदोरीकडे येत असताना ही दुर्घटना घडली. स्वाद हॉटेलजवळ असलेल्या वळणावर पिकअप पलटी झाली. सर्व प्रवासी गाडीबाहेर फेकले गेल्याने जखमी झाले आहेत. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
 

Web Title: 25 passengers injured in road accident near akole