जामखेडच्या २ मित्रांनी संपवलं आयुष्य; एकाच झाडाला लटकलेले मृतदेह पाहून सगळेच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:23 IST2025-04-13T11:21:59+5:302025-04-13T11:23:02+5:30
प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेडच्या २ मित्रांनी संपवलं आयुष्य; एकाच झाडाला लटकलेले मृतदेह पाहून सगळेच हैराण
अहिल्यानगर - जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील २ मित्रांनी पिंपरी चिंचवड येथे निर्जनस्थळी जाऊन एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. दोन्ही मित्र दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव उंडा येथून पिंपरी चिंचवडला गेले होते. शनिवारी दुपारी त्यांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. यापैकी एक जण विवाहित तर दुसरा अविवाहित होता. या दोघांच्या आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
घटनेची माहिती मिळताच दोघांचेही नातेवाईक पिंपळगाव उंडा येथून घटनास्थळी पोहचले. पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली जात आहे. दोघा मित्रांनी आत्महत्या नेमकी का केली याचे कारण शोधलं जात असून आत्महत्या केलेल्यांपैकी तुषार ढगे हा अविवाहित होता. तर दुसरा मित्र सिकंदर शेख याचे लग्न झालेले आहे.
पुण्याला गेले अन्...
तुषार ढगे याचे वय २५ तर सिकंदर शेख याचे वय ३० वर्ष होते. दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. गुरुवारी ते दोघेही पिंपळगाव उंडा येथून पुण्यातील पिंपरी चिंचवडला गेले होते. मोर्शी येथील भारत माता चौकात ते गेले होते. शनिवारी त्या दोघांचे मृतदेह एकाच वेळी एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेत. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.