फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:57+5:302021-07-18T04:15:57+5:30
फार्मसी कॉलेजचा विविध १३ आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार असून, याअंतर्गत यावर्षी बी.फार्मसीच्या अक्षय घोरपडे, गुलशन यादव, ज्योती वर्पे, ...

फार्मसीच्या १६ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी
फार्मसी कॉलेजचा विविध १३ आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार असून, याअंतर्गत यावर्षी बी.फार्मसीच्या अक्षय घोरपडे, गुलशन यादव, ज्योती वर्पे, तेजस कुटे यांची, तर एम.फार्मसीच्या सागर तांबे, शुभम थेटे, आकाश केरे, करण सोनवणे, नितीन पठारे, सचिन सूर्यवंशी, अमोल चौथे यांची कॉग्निझंट हेल्थकेअर व मर्क्युरी इंटरनॅशनल लेबोरेटरीज या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
महाविद्यालयातील अशोक सोडनर, देविदास लहामगे, अविनाश कोटकर, जयेश पवार, भारत अगिवले, उपासना घोलप, प्राजक्ता थोरात, प्रणिता पगारे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील एनआयपीईआर जेईई-२०२१ मध्ये विशेष यश मिळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख, इंद्रजित थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉक्टर मच्छिंद्र चव्हाण यांनी कौतुक केले. प्लेसमेंट विभागाचे प्रा. एच. डी. गुंजाळ व माजी विद्यार्थी, समन्वयक प्रा. एस. एम. काळमेघ यांनी विशेष परिश्रम घेतले.