नगरमध्ये १४२ दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद, सिव्हिल सर्जनला पोलिसांची नोटीस
By अण्णा नवथर | Updated: November 20, 2025 12:20 IST2025-11-20T12:20:15+5:302025-11-20T12:20:35+5:30
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून १४२ दिव्यांग प्रमाणपत्र डबल जावक क्रमांकाने नोंदवून वितरित करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नगरमध्ये १४२ दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद, सिव्हिल सर्जनला पोलिसांची नोटीस
- अण्णा नवथर
अहिल्यानगर - जिल्हा रुग्णालयातून १४२ दिव्यांग प्रमाणपत्र डबल जावक क्रमांकाने नोंदवून वितरित करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत अहिल्यानगरचे सिव्हिल सर्जन यांना नोटीस बजावण्यात आली असून, या प्रमाणपत्रांबाबत माहिती मागविण्यात आली आहे. दिव्यांग प्रमाणपत्राचा मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रणालीचा पासपोर्ट चोरी गेल्याचा गुन्हा अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणाचा तपास गेल्या एक वर्षापासून रखडलेला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर होण्याची व्याप्ती लक्षात घेऊन हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास केला. त्यात अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून डबल जावक क्रमांक ची नोंद करून १४२ प्रमाणपत्र देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही प्रमाणपत्रे संशयास्पद असून, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणांची माहिती जिल्हा रुग्णालय कडून मागविण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये या प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपी निष्पन्न झालेले आहे. आरोपी आरोपींची संख्या वाढू शकते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.