शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; एक जण बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 13:05 IST2020-09-29T13:04:46+5:302020-09-29T13:05:21+5:30
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला १३ वर्षीय मुलाचा पोहायला येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; एक जण बचावला
पळवे : पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला १३ वर्षीय मुलाचा पोहायला येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
राहुल रामदास जवक असे या मुलाचे नाव आहे. तर त्याचा चुलत भाऊ बचावला असून त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
राहुल बुडत असताना त्यास वाचविण्यासाठी गेलेला त्याचा चुलत भाऊ ऋतिक सतिश जवक याने मदतीसाठी आरडाओरडा केली. त्याला वाचविण्यासाठी स्वत: शेततळ्यातच उडी मारली. परंतु त्याला राहुलने मिठी मारल्याने गोंधळ उडाला.
दरम्यान, आजुबाजूच्या लोकांनी त्या दोघा भावांना बाहेर काढले. यात राहुल मात्र गतप्राण झाला. दुसरा भाऊ ऋतिक यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हे शेततळे दोन परसाचे आहे. राहुल हा सहावीच्या वर्गात शिकत होता.