शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगाम अडचणीत : टंचाईग्रस्त गावांना १२ टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: December 14, 2015 20:51 IST

पाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे

पाणी टंचाई शेवगावमध्ये पाणी टंचाईचे संकट गडद शेतीचे अर्थकारण कोलमडलेपाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे. शेवगाव : ऐन हिवाळय़ात शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट गडद बनत आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी तहानलेल्या गावांमधून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने मात्र मुळा धरणाचे पाणी सुटल्याने टँकरची मागणी असलेल्या गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्याने नागरिकांमधून नाराजी तसेच संतापाचा सूर व्यक्त होत आहे.तालुक्यातील १३ गावे व ४९ वाड्या- वस्त्यांना १२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील निंबेनांदूर, ढोरजळगाव शे, जोहरापूर, सामनगाव, लोळेगाव, ठाकूर निमगाव, भातकुडगाव, खामपिंप्री नवी, खामपिंप्री जुनी अशा गावातून गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट अधिक गडद बनत आहे. प्रशासनाने मात्र मुळा पाटपाण्याचे रोटेशन सुटल्याने वरील टंचाईग्रस्त गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या टँकर सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय वरिष्ठ स्तरावर सादर केल्याने संबंधितांच्या कामकाज पद्धतीबाबत टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथील जाणापूर, बोरबंद, चेकेवस्ती, दलित वस्ती, बडे वस्ती व बुधवंत वस्ती परिसरात पाणी टंचाईचे सावट कायम असल्याने प्रशासनाच्या पातळीवरुन ४ खेपा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई शाखेतून सांगण्यात आली. इतर प्रस्तावाबाबत वास्तविक मुळा पाटपाण्याचे रोटेशन 'टेल टू हेड' या पद्धतीने करण्याची मागणी असताना संबंधितांनी ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पाटपाण्याच्या लाभापासून कायम वंचित असलेल्या परिसराला यंदाही पाटपाण्याचा लाभ मिळाला नाही. ही वस्तुस्थिती असल्याने पाणी टंचाईच्या परिस्थितीची वरिष्ठांनी पाहणी करून तातडीने टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी) ■ अत्यल्प पावसामुळे लागोपाठ चौथ्या वर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामाची आशा लागली होती. मात्र, पावसाने निराशा केल्याने रब्बी हंगामही अडचणीच्या विळख्यात सापडल्याने शेती व शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडून पडले. त्यामुळे कमी पावसावर येणार्‍या कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, तालुक्यात तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आली. मध्यंतरी कांदा अडीच ते तीन हजारापर्यंत गेला होता. मात्र सध्या कांद्याचे भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. तालुक्यात ज्वारीचे २७ ते २८ हजार तर हरभर्‍याचे ८ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असून, ज्वारीवर चिकटा तर हरभर्‍यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.