नगर जिल्ह्यात आज १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले; १० रुग्णांची कोरोनावर मात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:35 IST2020-06-28T11:35:18+5:302020-06-28T11:35:53+5:30

नगर जिल्ह्यात  रविवारी (दि.२८जून) आणखी १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज १० जण बरे होऊन घरी परतले आहेत.

12 new corona positive found in Nagar district today; 10 patients overcome corona | नगर जिल्ह्यात आज १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले; १० रुग्णांची कोरोनावर मात 

नगर जिल्ह्यात आज १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले; १० रुग्णांची कोरोनावर मात 

अहमदनगर : नगर जिल्ह्यात  रविवारी (दि.२८जून) आणखी १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज १० जण बरे होऊन घरी परतले आहेत.

 रविवारी जिल्ह्यात आणखी १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील ६, नगर शहरात ४ तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

जिल्ह्यातील १० रुग्णांनी रविवारी  कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ५, नगर मनपा २, पारनेर,  नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे. 

संगमनेर तालुक्यात कुरण येथे २, पिंपरणे आणि साकुर येथे १ आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.

नगर शहरात सिद्धार्थ नगर, भिंगार, नवनागापूर आणि केडगाव येथे बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी, केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता. 

पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्ण संख्या आता ११३ झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Web Title: 12 new corona positive found in Nagar district today; 10 patients overcome corona