नेवासा फाटा येथे आयपीएल सट्टा बुकींवर छापा, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:38 IST2020-11-11T15:25:59+5:302020-11-11T15:38:36+5:30
नेवासा फाटा : मुंबई- दिल्ली अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल टी २० नावाचा मटका जुगार खेळताना वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

नेवासा फाटा येथे आयपीएल सट्टा बुकींवर छापा, १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेवासा फाटा : मुंबई- दिल्ली अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल टी २० नावाचा मटका जुगार खेळताना वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे आयपीएल टी -२० नावाचा मटका जुगार खेळत असताना बुधवारी पहाटे दोन वाजता छापा टाकला. या कारवाईत हुंडाई गाडीसह, सहा मोबाईल, मटरा खेळविण्याच्या साहित्यासह ३४ हजार रोख रक्कम, असा मिळून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आयपीएल मटका टी-२० खेळविणारा ज्ञानेश्वर बोरुडे, संतोष गुंजाळ यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. याबाब पोलिस काॉन्स्टेबल रवी गोविंद पवार यांनी दिलेल्या फियादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.