श्रीरामपुरात वॉरंटमधील १२ आरोपी गजाआड, अनेक गुन्ह्यांतील आरोपी, महिलांचाही समावेश
By शिवाजी पवार | Updated: March 27, 2024 15:04 IST2024-03-27T15:04:19+5:302024-03-27T15:04:53+5:30
मंगळवारी दिवसभर ही करवाई सुरू होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली.

श्रीरामपुरात वॉरंटमधील १२ आरोपी गजाआड, अनेक गुन्ह्यांतील आरोपी, महिलांचाही समावेश
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून वॉरंटमधील १२ आरोपींना अटक केली. यात महिलांचाही समावेश आहे.
मंगळवारी दिवसभर ही करवाई सुरू होती. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली. आरोपींवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. यात ललित दिलीप राऊत (रा.थत्ते मैदान), रमजान चिराउद्दीन सय्यद (रा. वार्ड दोन), महावीर रमेश साळवे (रा. टिळकनगर), जुनेद बाबा शेख (रा. वार्ड दोन), संदीप सुधाकर गोरे (रा. नांदुर), मिना शाम पवार (रा. दत्तनगर), आनंदा यशवंत काळे (रा. सुतगिरणी), निर्मला राजेंद्र पंडीत (रा. दत्तनगर), साधना मोहन काळे (रा. दत्तनगर), चंद्रकांत शाम पवार (रा. दत्तनगर), उषा प्रभाकर काळे (रा. दत्तनगर), संतोष गोरक्षनाथ राशिनकर (रा. सुभाषवाडी बेलापूर) यांचा समावेश आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक नितीन देशमुख यांनी ही कारवाई केली.