जिल्ह्यात १०२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST2021-04-19T04:19:18+5:302021-04-19T04:19:18+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी २३१२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू ...

102 killed in district | जिल्ह्यात १०२ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १०२ जणांचा मृत्यू

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी २३१२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९९०५ इतकी झाली आहे. खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे झालेल्या मृत्यूची नोंद उशिराने व एकाच दिवशी केल्याने जिल्हा प्रशासनाच्या पोर्टलवर २४ तासांत १०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी शनिवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासन मृत्यूचा आकडा लपविणार नसल्याचे सांगितले. तसेच अधिकाऱ्यांनीही खासगी रुग्णालयांकडून माहिती वेळेत अपलोड होत नसल्याने त्याची पोर्टलवर उशिरा नोंद होते. मात्र, कोणतीही माहिती लपविली जात नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रविवारी खासगी रुग्णालयांनी व शासकीय यंत्रणेने तातडीने झालेल्या मृत्यूची नोंद केल्याने ही संख्या अचानक वाढली असून ते एकाच दिवसातील नव्हे, तर आठ दिवसांत झालेले मृत्यू असल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले.

रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७१३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९६७ आणि अँटीजेन चाचणीत १९१२ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १७६, अकोले ६७, जामखेड ४८, कर्जत ७०, कोपरगाव २६, नगर ग्रामीण ५२, नेवासा ३०, पारनेर ३६, पाथर्डी ५८, राहता २१, राहुरी ३२, संगमनेर ११, शेवगाव ०७, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट बोर्ड २८, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ०२ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३८०, अकोले २५, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ६८, नेवासा ९, पारनेर १५, पाथर्डी २३, राहाता ८१, राहुरी १३, संगमनेर १३५, शेवगाव १४, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर २२, कॅंटोन्मेंट बोर्ड २९ आणि इतर जिल्हा ९४ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १९१२ जण बाधित आढळून आले. नगर शहर २९३, अकोले ९७, जामखेड २९, कर्जत ८१, कोपरगाव ९७, नगर ग्रामीण २२७, नेवासा १६७, पारनेर ७३, पाथर्डी ११४, राहाता २१०, राहुरी १५७, संगमनेर ७१, शेवगाव १३२, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर ६९, कॅन्टोन्मेंट बोर्ड २० आणि इतर जिल्हा ३१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

-----------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : १,१४,६४२

उपचार सुरू असलेले रुग्ण : १९९०५

मृत्यू : १५८२

एकूण रुग्णसंख्या : १,३६,१२९

Web Title: 102 killed in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.