शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

सकारात्मक... अहमदनगरात शाळा सुरू होऊन १०० दिवस; तरी एकही विद्यार्थी आढळला नाही पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 05:37 IST

गावकऱ्यांनी एकत्र मिळून काळजी घेतल्यानं ही किमया साधली आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांनी एकत्र मिळून काळजी घेतल्यानं ही किमया साधली आहे.

अहमदनगर : शाळा... मुलांसाठी जणू आनंदाचा ठेवा... मित्रांच्या भेटी... डबे खाण्याचा आनंद... मैदानावरच्या खोड्या आणि मौजमजा... पण कोरोनामुळे मुलांचा हा आनंद गेल्या दीड वर्षांपासून हिरावून घेतला आहे. परंतु, एक शाळा यास अपवाद ठरली आहे. कोरोनाकाळातही हिवरेबाजारच्या शाळेने एक-दोन नव्हे तर तब्बल १०० दिवस पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे योग्य ती काळजी घेतल्याने कोणालाही संसर्ग झालेला नाही. गावकऱ्यांनी ही किमया साधली आहे.

हिवरेबाजारचे ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्र येत स्व-जबाबदारीवर १५ जूनलाच इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू केले होते. शासनाची परवानगी नसताना पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभेने हा निर्णय घेतला. शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांचा मेळावा झाला. मुलांच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. मुलांनी आपले अनुभव निबंध व कवितांमधून शब्दबद्ध केले. अनेकांनी चित्रे काढली.

हिवरेबाजारने अशी घेतली काळजी१. मुले वर्गात येण्याअगोदर तापमान तपासले जाते आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात. २. मुलांनी शाळा आणि घरांव्यतिरिक्त कुठेही जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. ३. घरातील व्यक्ती आजारी असल्यास अथवा मुलाला थंडी-ताप जाणवल्यास शाळेत न येण्याची सूचना केली जाते.

सर्व नियमांचे काटेकोरपणे पालनविद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी एकजूट दाखवली, त्यामुळेच आम्ही शाळा भरवू शकलो. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावाने हे धाडस केले. सर्व नियम पाळल्याने कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही.पोपटराव पवार, राज्य कार्याध्यक्ष, आदर्श गाव समिती

कोरोनाशी लढायला शिकलोघरी राहून आम्ही कंटाळलो होतो. मोबाइलवर ऑनलाइन वर्गात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आमच्या शिक्षक व गावाने जो शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याचा आनंद झाला. या १०० दिवसांत आम्ही कोरोनाशी कसे लढायचे, ते शिकलो.तेजस खोडदे, विद्यार्थी

तज्ज्ञ काय म्हणतात....शाळांमध्ये संसर्गाची शक्यता कमी

  • शालेय विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले आहे. 
  • लहान मुलांमध्ये प्रौढ व्यक्तींइतक्याच अँटिबॉडीज निर्माण झाल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या चौथ्या सिरो सर्वेक्षणात आढळून आले होते. हे लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, स्वच्छता राखून शाळा पुन्हा सुरू करायला हरकत नाही, असे स्वामीनाथन म्हणाल्या.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSchoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीAhmednagarअहमदनगर